दुनिया तुला विसरेल - वपु
सुख आणि दुःख मानवी जिवनातिल अविभाज्य घटक आहेत. दु:ख जे नाकारता येत नाहि. पण काहि माणस हि अलौकिक असतात ते दुःखाला कवटाळुन न रहाता त्यामागचे कारण शोधु लागतात, इतर जण माझ्याशी अस का वागली? मनुष्य हा असा एकच प्राणी आहे जो आपल्या दु:खाच उद्दातिकरण करुन त्यातुन काही नविन निर्माण करु शकतो. त्याचच प्रत्यय म्हणजे भाऊसाहेबांची शायरी किंवा भटांच्या गझल. स्वतःच्या दुःखात आसव गाळण्यापेक्षा त्या आसवांतुन लोकांना आनंद निर्माण करुन दिला तो भाऊसाहेबांनी.
भुतकाळातल्या चुका मी परत करणार नाही अस सर्वच म्हणतात पण भाऊसाहेब भुतकाळाला म्हणतात बेट्या जर पुन्हा एकदा जगण्याची संधी दिलीस तर अशीच बेवकूफी करत असाच जगत राहिन.
अता पुस्तकाकडे वळुया विषय आहे भाऊसाहेबांची शायरी. १९६४-६५ च्या काळात भरवलेल्या पाटण्करांच्या एका घरगृती मैफिलिला वपु हजर होते. ती मैफिल व शायरी वपुंनी अतिषय सुंदर शब्दात दिली आहे. वपु म्हणजे सौंदर्य उपासक व्यवसायाने आर्किटेक्ट असलेले वपु हे उत्तम कथालेखनकार, नाटककार आणि सर्वात महत्वाच म्हणजे लहानश्या वस्तुलाही मनापासुन दाद देणारे याचा प्रत्यय पुस्तक वाचताना येतोच.
वपुंनी पुस्त्तकात सुरवातिला म्हटल आहे की तुम्हाला इथे पाटणकरांची शायरी मिळेल पण ती तुम्हाला कडकडुन मिठी मारणार नाही पण तसे काही होत नाही वपु तुम्हाला सरळ त्या मैफिलीत घेऊन जातात. भाऊसाहेब पाटणकर यांच्या शेरावर वपुंच विवचन वाचण्यासारखे आहे.
मुळात भाऊसाहेब पाटणकर यांची शायरी आणि त्याचे रसग्रहण तेही वपुंच्या शब्दात म्हणजे सुवर्णकांचण योगच.
भाऊसाहेबांच्या चाहत्यांनी एकदा तरी वाचाव अस पुस्तक.
"नुसतेच ना दुनियेत तुमच्या, आलो अम्ही गेलो अम्ही
भगवन तुझ्या दुनियेस काही, देऊनी गेलो अम्ही
शायरी तुला अर्पून गेलो, माझे सर्वस्व ती
दुनिया तुला विसरेल भगवन, ना अम्हा विसरेल ती"- भाऊसाहेब पाटणकर
------सुहास सोनवणे.

3 comments:
मी पण वपुचा चाहता आहे
suhasji,
marathit na lihilyabaddal kshamasva.pan rahvena... karan me hi 3/4 mahinyanpurvi vachle te pustak...khupach sundar...apan va pu ni wa wa yan baddal kay bolnar...asmanya pratibha gheun janmala aleli hi manse...jyanchya mule amha sarvanche ayushya sukhache zhale...tumhi (DOSTHO)vachle ka.va punchech ahe bahuda pan mala nav nakki athvat nahiye...
typical puneeri in bahrain.
अभिप्रायाबद्द्ल धन्यवाद हरेक्रिष्णाजी व Anonymous
@Anonymous
दोस्त हो या शायरी च्या पुस्त्काविषयी जर बोलत असाल तर ते वपुंचे नाही तर पाटणकरंचे आहे.
सुहास सोनवणे.
Post a Comment