"शाळा - मिलिंद बोकिल"
"शाळा" नाव घेताच आठवतात ते बालपणिचे रम्य दिवस. आजच्या धकाधकीच्या जिवनात 'बालपणिचा काळ सुखाचा' असे प्रत्येकाच्या तोंडातुन एकदा तरी निघतेच आणि ते दिवस मिलिंद बोकिल यांनी शव्दात आगदि सहजपणे बांधले आहेत. शाळे विषयी आतापर्यंत बरच वाचल आहे पण सगळ्या भावना शब्दात मिळाल्या ते बोकिल यांच्या शाळेत.
मुकुंद जोशी उर्फ जोश्या आणि त्याचे तिन मित्र चित्र्या, फावड्या, आणि सु-या यांच्या पासुन सुरु होणारे कथानक म्हणजे ईयत्ता ९ वीचे वर्ष. शाळेतिल शिक्षक, त्यांची टोपण नावे (सगळ्याच शाळां मध्ये असतात) त्यांच्या शिकण्याच्या पद्धति. मुलिंची व मुलांची टोपन नावे याबरोबर पुढे जात असतानाच मुकुंद व त्याच्या घरच्यांचिही ओळख हि होतेच.
पौगंडा अवस्थेत होत जाणारे बदल त्यामुळे बदलत होणारे विचार, मनात निर्माण होनारे आकर्षण म्हणा कि प्रेम पण परिणास्तव निर्माण होणारी स्थिती आदि विषयांना लेखकाने अगदि सहजतेने हाताळल आहे.शाळेबरोबर इतर विषय हाताळण्याची लेखकाची हातोटी वाखाडण्याजोगी आहे. भाषेबद्दल बोलायच तर अगदि शाळेत बोलली जाणारी भाषा इथे वाचायला मिळते.
शाळेत गेलेल्या पेत्येकाने वाचाव अस हे पुस्तक आहे.
------सुहास सोनवणे.

2 comments:
namaskar, aaprateen hi kalpana ahey.
naste udhyog.
j me atta sadya kartoi.
suhas keep it up.
Regards
Marathi bana.
shala he milind bokil yanche pustak keval sahityik kalpanik nahi tar te shaikshanik manas shastra, bal manas shastra tasech tatkalin samaajik, rajkiy paristhitivar bhashya tharate.
Post a Comment