गणगोत- पुल
वाढत्या वयाबरोबर पुढे पाहण्याऐवजी मन मागेच पाहण्यात रमते... आयुष्याच्या ह्या प्रवासात कितीतरी माणसे भेटली. कुणी शेजारी म्हणून लाभले. कुणी आळीतले आळीकर, कुणी गावातले गावकर. कुणी जवळ आले, कुणी खेचून जवळ घेतले. काहींचे आकर्षण वाढले, काहींचे अचानक कमीही झाले. वर्डसवर्थच्या 'यारो री व्हिजिटेड' सारखी काही माणसे पुनर्भेटीत निराळीच वाटली. काहिंच्या वेव्हलेंग्थस पटकन जमल्या, काहिंच्या नाही जमल्या. काहींनी कधीही न फेडता येणा-या ऋणाचा भार अलगत खांद्यावर ठेवला. प्रत्येकाला हे असे कधी जवळीक तर कधी दुरावा अशा हेलकाव्यात तरंगणारे गणगोत लाभतच असते. माणूस कधीही एकटा नसतो. त्याने तसे असूही नये. माझे 'गणगोत' फार मोठे आहे. अनिलांनी म्हटल्याप्रमाणे 'इथे सखे नि सोबती कुणी इथे कुणी तिथे!
-----प्रस्तावनेतून
पुलं चे चहाते महाराष्ट्रभरच नव्हे तर जगभर पसरलेले आहेत पुल म्हणजे एक चतुःसुत्रि व्यक्तिमत्व. पूलं बद्दल मी लिहायच म्हणजे ज्योतीने तेजाची आरती करण्यासारखेच आहे. पुल हे व्यक्तिमत्वच अस होत की ते प्रत्येकाला वेड लावुन गेल. हास्याचा बादशाहा म्हणुन पसिद्ध असलेल्या या बादशहाने काही अप्रतिम रचना ही केल्या आहेत, गणगोत हे त्यातीलच एक. पुलंच 'व्यक्ति आणि वल्ली' या पुस्तकाप्रमानेच व्यक्तिचित्रावर आधारित हे पुस्तक, पण या व्यक्तिरेखा या काल्पनिक नसुन अस्तित्वातिल आहेत.
व्यक्तिचित्र तर बरेच लिहितात पण त्या व्यक्ति जेव्हा वाचकाशी प्रत्यक्ष बोलु लागतात तेव्हाच त्या लेखकाच लिखाण सार्थकी लागत आणि ही अनुभुती येते ती गणगोत वाचताना. दिनेश वाचाताना तुम्ही लहानपणात जातात तर बळवंत मोरेश्वर पुरंदरे (बाबासाहेब पुरंदरे) वाचताना तुम्ही इतिहासात हरवतात. सामान्य व्यक्तिचे गुण पकडुन किती त्याचे व्यक्तिचित्र किती छानपणे मांडता येत याचा प्रत्यय तुम्हाला चोभे वाचताना नक्कि येईल.
आपापल्या छेत्रातिल दिग्गजांची व त्यांच्या गणगोताची ओळख करुन देण्याचा प्रयत्न पुलंनी ईथे केला आहे. पुलंच हे गणगोत फक्त वाचनासाठी व्यक्तिचित्र नाहित तर तर माहितीचा साठाही आहेत ब-याच जनांची खरी ओळख गणगोत तुम्हाला करुन देईल.
-------सुहास सोनवणे.